स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार ता.29) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे परवानगीशिवाय जवळील सर्व्हिस रोड तोडल्याबद्दल कारवाई करून मे जे. एस. धुत, शंकर नगर, नागपूर यांच्यावर 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शेखावत लॉजिस्टीक, गणेशपेठ, नागपूर यांच्यावर कार्यालयाचा कचरा जवळच्या रस्त्यावर पसरल्याबद्दल कारवाई 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गांधीबाग झोन अंतर्गत मे. महाविर टेक्स़टाईल्स, नंगा पुतला चौक, गांधीबाग, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच चवरीवार किराणा स्टोर्स, गोलीबार चौक, इतवारी, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. मिश्रा किराणा स्टोर्स, रानी दुर्गावती चौक, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. के.के. इथिनिक, भरतवाडा नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शिवतिर्थ वॉटर पार्क, बाळाभाऊपेठ यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जनाब मिर्झा आरीफ बैग, छावनी, सदर, नागपूर यांच्यावर बोअरवेल खोदून जवळच्या फूटपाथ परिसरात चिखलाचे पाणी पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आगामी संसद अधिवेशनावर दिल्लीत बी.आर.एस.पी. चे धरणे आंदोलन

Tue May 30 , 2023
नागपूर :- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगना व उत्तर भारतातील राज्ये यांच्या तर्फे दिनांक २६-२७ जुलै २०२३ रोजी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी केंद्रातील भाजपा सरकारच्या भारतीय राज्य घटना लोकशाही विरोधी धोरणांच्या निषेधार्थ व भाजपच्या धर्म, जाती धुवीकरनावरील आधारीत ‘नफरत की राजनीती’ याचा तीव्र धिक्कार करण्याससाठी पक्षाच्या राज्य शाखेच्या वतीने जाहीर धरना आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बीआरएसपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com