स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.2) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे परवानगीशीवाय बेकायदेशीर रोडवर शेडचे बांधकाम केल्याबद्दल श्री सदानंद पाटील, सुरज सोसायटी,‍ मनिष नगर येथे कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत चंदु किराणा स्टोअर्स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मिडकेअर पॅथोलॉजी लॅब, प्रभाग क्र. 24, एच.बी. टाऊन, जुना पारडी नाका, नागपूर यांच्याविरूध्द अनधिकृतपणे जैव वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 74 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Tue May 2 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (2) रोजी शोध पथकाने 74 प्रकरणांची नोंद करून 55500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com