नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.09) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे इम्पॅरियल साई कंन्स्ट़्र्रक्शन, पडोले लेआऊट, परसोडी यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्या पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. देहा बाबु, दाभा, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. विरास्वॉमी साऊथ इंडियन रेस्टॉरेंट, अशोका चौक, सदर, यांच्यावर हॉटेलचा कचरा फुटपाथवर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सारस टयुशन क्लासेस, सन्मार्ग नगर, हुडकेश्वर रोड, यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमेनी प्लास्टीक, कॉटन मार्केट, या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे तेजस प्लास्टीक, दारसकर रोड, इतवारी, या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत अभय भोयर, नेताजी नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. एस.बी.ई. हाऊस अपार्टमेंट, गोकुल कॉलोनी, बोरगाव, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.