नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.27) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत जिवनचर्या नगर येथील पार्क व्हिव -22 आणि स्वालंबी नगर येथील स्टार लिंक बिल्डर्स यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग न.15, निधी गौरव कॉमप्लेक्स, रामदासपेठ येथील निधी क्लीनिक यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत बायो मेडिकल वेस्ट कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.35, श्याम नगर, मनीष नगर येथील एपेक्स बिल्डर्स यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.