स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.5) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत चकना चौक, इतवारी येथील संताजी स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन येथील श्रध्दानंदपेठ येथील भारत नर्सरी यांच्याविरुध्द नर्सरीचे साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत संघर्षनगर चौक, वाठोडा येथील अब्दुल वाहेद यांच्याविरुध्द भंगार साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय महामार्ग संताजी नगर कांद्री येथे युवकावर चाकुने हल्ला

Wed Dec 7 , 2022
पोस्टे कन्हान ला आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, दोन आरोपी अटक.  कन्हान :- परिसरात आणि ग्रामिण भागात गुन्हेगारी चे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असुन नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गवर संताजी नगर कांद्री येथे आठ आरोपींनी संगमत करून एका युवकावर चाकुने हल्ला करून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी विरेंद्र यादव यांच्या तक्रारीने पोस्टे ला आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!