स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.2) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली, गांधीबाग आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील दर्पण ट्रेडर्स यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत टेलिफोन एक्चेंज चौक येथील चिंतामणी हार्डवेअर यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगलवारी झोन अंतर्गत बेझनबाग येथील सिमरण खालसा कॅफे यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन येथील Parag Nichkawade यांच्याविरुध्द आकर्षक पेंडाल/मंडपाने रस्त बंद केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत धंतोली येथील Banti Bagdiya यांच्याविरुध्द बांधकाम साहित्याची धुळ आणि चिखल परिसरात पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत बाळाभाऊपेठ येथील मोहम्मद सॉहिल आटो वर्क यांच्याविरुध्द फुटपाथ आणि रस्त्यावर सामान पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण 804 उमेदवारी अर्ज सादर

Sat Dec 3 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -27 सरपंचपदाच्या निवडीसाठी 120 उमेदवारी अर्ज तर 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 684 उमेदवारी अर्ज सादर कामठी :-18 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा कालावधीतील 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत 27 सरपंच पदासाठी 120 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले असून 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 684 उमेदवारांनी उमेदवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com