नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.16) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत गोळीबार चौक, इतवारी येथील सालेकर जनरल स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत वामन संकुल, त्रिमुर्तीनगर येथील डेन्टल क्लिनीक यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत क्लिनीकचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत बजाजनगर येथील M/s Dak Wood Restaurant Café यांच्याविरुध्द कचरा आणि तंदुर राख रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कच्चीमेट अमरावती रोड येथील M/s Food Beyond Fantacy यांच्याविरुध्द कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच लेन्ड्रापार्क, रामदासपेठ येथील संस्कृती आर्या कन्स्ट्रक्शन यांच्याविरुध्द बांधकामाचे सांडपाणी सर्व्हिस रोडवर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत बैद्यनाथ चौक, उंटखाना येथील मेमोरियल हॉस्पीटल प्रा.लि. यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगलवारी झोन अंतर्गत केटी नगर, गिटटीखदान, काटोल रोड येथील M/s Hotel Domino’s यांच्याविरुध्द फायरिंग रेंज बोरगांव येथे मोठया प्रमाणात कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com