स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.13) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत नंगा पुतळा, भावस्कर रोड येथील राजेश किराणा स्टोअर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत शांती नगर, NIT गार्डन समोरील शाही राज डिस्पेन्सरी शॉप या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत घाट रोड, प्रभाग न. 17 येथील लाहानुजी स्टील ट्रेडर्स यांच्याविरुध्द स्टील्स आणि इतर ट्रेडिंग मटेरीअल्स फुटपाथ/रस्त्यावर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत विदयानगर, वाठोडा येथील प्रभा नारायण ढाले (बिल्डर्स) यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“क्षयरुग्ण शोध मोहिम (ACF) दि. 08/03/2023 ते 21/03/2023 राबविण्यात येत आहे.

Tue Mar 14 , 2023
नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत नागपूर शहरात क्षयरुग्ण शोध (ACF) मोहिम दि. 08/03/2023 ते 21/03/2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या संदर्भात सहसंचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग व क्षयरोग, पुणे यांच्याकडुन हि मोहिम राबविण्याच्या सुचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने या अभियानामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामधिल सर्व नागरी आरोग्य केंद्र व हेल्थ पोस्ट यांचा समावेश करण्यात आलेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com