स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.14) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत कांजी हाऊस चौक, इतवारी येथील अनुज वस्त्रालय या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत फ्रेण्डस कॉलोनी, काटोल रोड येथील प्रयाग पॅराडाईस यांच्याविरुध्द रस्त्यालगतची सिवेज लाईन तोडल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.35, विजयानंद सोसायटी, नरेन्द्रनगर येथील आराध्या बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच प्रभाग न.35, नरेन्द्रनगर येथील ए.डी.ज्वेलर्स यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर बॅनर / होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत प्रभाग न.23, वर्धमाननगर येथील चावला बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

HDFC Bank launches pilot for Offline Digital Payments

Wed Feb 15 , 2023
First-of-its-kind digital payment solution piloted under RBI’s Regulatory Sandbox Program. Mumbai : HDFC Bank has launched a pilot in partnership with Crunchfish, to test offline digital payments for merchants and customers under the RBI’s Regulatory Sandbox Program, known as ‘OfflinePay’. HDFC Bank’s ‘OfflinePay’ will enable customers and merchants to make and receive payments even when there is no mobile network. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com