स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.24) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न.18, शिवाजी पुतळा चौक, महाल येथील दिलीप प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग न. 21, शांतीनगर येथील केतक स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न. 35, मनीष नगर येथील जे.पी.रेसिडेन्सी यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

13th National Voters’ Day (NVD) to be celebrated on 25th January 2023

Wed Jan 25 , 2023
Theme for this year’s NVD is ‘Nothing Like Voting, I Vote for Sure’ NEW DELHI :- Election Commission of India is celebrating 13th National Voters’ Day on 25th January 2023. President of India Droupadi Murmu will be the Chief Guest at the national function being organized in New Delhi by the Election Commission of India. Union Minister for Law and Justice,  Kiren […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com