स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.19) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न.8, टिमकी, मोमिनपूरा येथील ईशा सोनपापडी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग न.15, शंकरनगर येथील M/s Fuel Station यांच्याविरुध्द डिसल्टिंग चेंबरची उपलब्धता नसतांना सांडपाणी आणि अन्न व कचरा टाकणे तसेच कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धंतोली झोन अंतर्गत सुभाष रोड, कॉटन मार्केट येथील शितल कृषी सेवा यांच्याविरुध्द दुकानातील कचरा ब्लॅक स्पॉट पॉईंटवर टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एन.वी.सी.सी. ने आगामी केन्द्रीय बजट 2023-24 में लघु व मध्यम व्यापारियों को राहत देने की मांग की

Fri Jan 20 , 2023
नागपूर :- नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था है तथा चेंबर सदैव व्यापारी समुदाय के साथ जनमानस के हितार्थ चेंबर व्यापारिक हितों के लिये सरकारी एवं गैर सरकारी संस्थाओं के साथ समन्वय बनाकर उनके मध्य – सेतु का कार्य करता है। चेंबर के अध्यक्ष अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) ने वित्त मंत्रालय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com