नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २१) ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, नेहरूनगर आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात ४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २०,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच ७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत हिंगणा रोड स्थित कासा अनप्लगड कॅफे हाऊस या दुकानाविरुध्द कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत शिवाजी नगर येथील युनिवर्सल हाऊस प्रायव्हेट लिमिटेडला बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धंतोली झोन अंतर्गत नरेंद्र नगर येथील गुरूदत्त सोसायटी, विघ्नहर्ता अपार्टमेंटला बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरूनगर झोन अंतर्गत भांडे प्लॉट चौक येथील दि. होस्ट चौपाटी दुकानाविरुध्द प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर वाठोडा रिंग रोड येथील अजय अंबिका भोजनाल या हॉटेल विरोधात हॉटेलचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सक्करदरा भांडे प्लॉट येथील गणराज फ्रुट हाऊस या दुकानाविरुद्ध कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून ६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बापू नगर येथील सिटी कार बाजार या प्रतिष्ठानावर कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत नाईक तलाव प्रभाग क्रमांक २० येथील नागपूर सिटी स्वीट यांच्याविरुद्ध प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत एच बी टाऊन, पारडी येथील साई सामोसा या दुकानाविरुद्ध प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.