स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.16) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 11 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सोमलवाडा चौक येथील M/s Panino यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत कॅनल रोड येथील जनाब अस्लम खान यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत गोलीबार चौक, इतवारी येथील शर्मा स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत धंतोली येथील केतकी नर्सिंग होम यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत हॉस्पीटलचा कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच वसंत नगर, दिक्षाभूमी येथील शांती कन्स्ट्रक्शन यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा जाळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत टिळक नगर, गोकुलपेठ येथील मान्सी गर्ल्स होस्टेल यांच्याविरुध्द रस्त्यालगत वस्तीगृहाचा कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत न्यू नरसाळा दिघोरी येथील Keshav Realators यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तिरोडा तालुका व शहर कॉंग्रेस पक्षाच्या वतिने भारत जोडो कार्यकर्त्याची टीम रवाना

Thu Nov 17 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुका काँग्रेस व शहर कॉंग्रेस च्यावतीने भारत जोडो पदयात्रेकरीता तालुका अध्यक्ष राधेलाल ब्रिजलाल पटले याच्या हस्ते हिरवी झेडी दाखवून रवाना करण्यात आली. कांग्रेस पार्टी वतीने भारत जोड़ो यात्रा ‘ 7 सितंबर , 2022 को कन्याकुमारी वरुन सुरवात करून 3,570 किमी लांब, 150 दिवसीय ‘ नॉन – स्टॉप ‘ पदयात्रा होणार जे देशातील 12 राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com