स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.3) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 80 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 9 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत गांधीबाग मार्केट येथील अशोक इन्ट्रप्राईजेस या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत दही बाजार इतवारी येथील नरेश पत्तल भंडार या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रतापनगर रिंग रोड येथील जावेद स्क्रॅप यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग नं.31, हनुमाननगर येथील काचोरे बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत बेसा पॉवर हाऊस रोड, दिघोरी येथील कदिर भाई स्क्रॅप यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत इंदोरा चौक, कामठी रोड येथील Amaira Dental Clinic यांच्याविरुध्द जैव-वैद्यकीय कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘सिकलसेल वारियर्स’च्या हेल्पलाईन सेवांना प्रारंभ

Fri Nov 4 , 2022
स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम सिकलसेल ग्रस्तांसाठी मुख्यालयात औषधांचा पुरवठा नागपूर :- वंचित घटकांमध्ये सर्वाधिक आढणारा सिकलसेल आजार हा आनुवांशिक रक्तदोशातून होत असतो. नागपूरसह विदर्भात सर्वाधिक आढळणाऱ्या या आजाराबाबत ‘सिकलसेल वारिर्यस’ यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे सिकलसेल रुग्णांच्या समस्यांचे निराकारण व्हावे या हेतूने स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com