नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.20) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 51 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धंतोली, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत श्रीराम अर्पाटमेन्ट, जयताळा रोड येथील पोर्णिमा डिस्पोजल्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत टि-पाईंट, मनीष नगर येथील अपोलो फार्मसी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत नंगापुतला चौक, इतवारी येथील वरुण एजन्सी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत ठक्करग्राम, नंदगिरी, तांडापेठ येथील स्वरा स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत कच्चीविसा, लकडगंज येथील श्रेयश क्लॉथ स्टोअर्स आणि भरतनगर चौक येथील मीर्चीलाल सोनपापडी या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत अत्रेय ले-आऊट, कोतवालनगर येथील Shri Path Diagnostics यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत दत्तात्रयनगर येथील गणेश मिष्ठाण भंडार यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.