स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.27) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत त्रीमुर्तीनगर येथील Hotwar Milk Dairy आणि सप्तसागर धान्य भंडार यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत सिताबर्डी मेन रोड येथील रोशन केपलरमाणी (बॉम्बे शॉप) यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत अंबाझरी तलाव येथील मनोज भैसारे यांच्याविरुध्द कचरा पॅकिंग मटेरीअल चा कचरा तलाव आणि आजुबाजुच्या परिसरात पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छठपूजा : ३१ को मेट्रो की विशेष ट्रेन उपलब्ध

Fri Oct 28 , 2022
• तड़के ४ बजे से सेवा होगी प्रारंभ नागपुर :- छठ पूजा के प्रतियों के लिए महामेट्रो की ओर से ३१ अक्टूबर को एक्वा लाइन पर तड़के ४ बजे से विशेष मेट्रो रेल सेवा उपलब्ध करने की घोषणा की गई है । विशेष मेट्रो सेवा सीताबर्डी इंटरचेंज और लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन से सुबह ४ बजे से १५ – १५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com