स्वच्छ भारत अभियान : ट्रान्सपोर्ट कंपनीवर कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.10) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील रजत इन्ट्रप्राईजेस या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत वाडी नाका दाभा येथील एन.एल.गुप्ता ॲण्ड ट्रान्स्पोर्ट कंपनी यांच्याविरुध्द कंपनीची सेवा न देणारे वाहने रस्त्यालगत उभी करुन वाहनांचा भंगार पसरविल्याबद्दल कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोरोना : मनपाचे रुग्णालय सज्ज ठेवण्याचे निर्देश

Mon Apr 10 , 2023
अतिरिक्त आयुक्तांनी घेतला रुग्णालयांतील व्यवस्थेचा आढावा नागपूर : शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संभाव्य धोका टाळता यावा यासाठी मनपाची सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आरोग्य विभागाला दिले. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी विभागाला दिले होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राम जोशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com