स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर कारवाई

नागपूर, ता. २५ : नागपूर महानगरपालिकेने शुक्रवारी (ता.२५) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत सीताबर्डी मोदी गल्ली नं.०३ येथील हैरी मोबाईल या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्रनगर येथील सिध्दी विनायक अर्पाटमेंट यांच्याविरूध्द रस्त्यालगत बिल्डींग मटेरियल टाकल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत डिप्टी सिग्नल येथील डी.पी. इसपाल यांच्याविरूध्द फुटपाथवर लोखंड ठेवल्यामुळे कारवाई करून ५ हजार रूपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत हबीब नगर येथील स्टार बेकरी या दुकानावर बेकरीचा कचरा परिसरात टाकल्यामुळे कारवाई करून ५ हजार रूपयांचा दंड वसूल केला.

          उपद्रव शोध पथकाने बुधवारी ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५  हजार रुपयांचा  दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

देशाच्या निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर निती आयोगाचा ‘निर्यात सज्जता निर्देशांक’जाहीर  

Fri Mar 25 , 2022
  नवी दिल्ली, दि. 25 : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी  नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१’ अहवालात 77.14 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले  आहे.            देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, निती आयोगाने आज ‘निर्यात सज्जता  निर्देशांक-२०२१’ (Export Preparedness Index) (दुसरी आवृत्ती) जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव बी.व्ही.आर. सुब्रमण्यम यांच्या उपस्थितीत हा निर्देशांक अहवाल  प्रसिद्ध करण्यात आला. Follow us on Social Media […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com