कमला नेहरू महाविद्यालयातील संगीत विभागाचे सुयश

नागपूर : महाराष्ट्र शासनांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उत्कर्ष’ या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा 2022-23 मध्ये कमला नेहरू महाविद्यालयातील एम.ए.भाग 1 संगीत विभागाचा विद्यार्थी आदित्य सावरकर याने या स्पर्धेत एकूण तीन पारितोषिक प्राप्त करून एका नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

‘उत्कर्ष’ या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतर्गत झालेल्या भक्तीगीतामध्ये प्रथम पारितोषिक, समूहगीतामध्ये द्वितीय पारितोषिक तर लोकगीतामध्ये द्वितीय पारितोषिक प्राप्त करून आदित्य सावरकर या विद्यार्थ्यांने स्वतःबरोबरच महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. त्याने प्राप्त केलेल्या या उत्तुंग यशाबद्दल अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा  डॉ. सुहासिनी वंजारी, संस्थेचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार अँड. अभिजित वंजारी, संस्थेच्या कोषाध्यम डॉ.स्मिता वंजारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप बडवाईक यांनी आदित्य सावरकरचे कौतुक व अभिनंदन केले. संगीत विभागाच्या प्रमुख प्रा. प्रिती महाजन यांचे मार्गदर्शन आदित्य सावरकरला लाभले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव , बॅडमिंटन अंतिम निकाल

Thu Jan 19 , 2023
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील बॅडमिंटन स्पर्धेत रिद्धी तिडके, अमेय नाकतोडे व गौरव रेगेने विजेतेपदाचा दुहेरी मुकुट पटकाविला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुभेदार हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. विजेत्यांना माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे मंगेश काशीकर, स्पर्धेचे कन्वेनर सचिन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com