मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु

– ३१ जानेवारी पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करणे बंधनकारक

– नागरिकांनी सहकार्य करण्याचे मनपाचे आवाहन

चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे कार्य सुरु झाले असुन सर्वेक्षण युद्धपातळीवर करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ८२५ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्वेक्षण ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याने वेळेचा अभाव लक्षात घेता सर्वे करणाऱ्या प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत असुन शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दि.२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात १५४ प्रश्न विचारले जाणार सर्वेतील माहितीची ऑनलाईन नोंद केली जाणार आहे. नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना मनपातर्फे ऑनलाईन माहिती घेण्याचे प्रशिक्षण आले असुन सदर कर्मचारी मनपा हद्दीत घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती घेत आहेत.

सर्वेक्षणादरम्यात केवळ मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल. सर्व प्रगणकांकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेले ओळखपत्र असणार आहे.कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही.तसेच सर्वेक्षणासाठी भेट दिलेल्या या घरावर MSBCC या पद्धतीची निशाणी नोंदविणार आहे.या सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरासुद्धा तुमच्या घरी सर्वेक्षणासाठी येऊ शकतात.यादरम्यानच्या कालावधीत आपण घरी उपस्थित राहून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या मनपाच्या प्रगणकास माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भ वनवासी कल्याण आश्रम, नागपूर महानगर 'नारी शक्ति दिवस'

Wed Jan 24 , 2024
– विदर्भ वनवासी कल्याण आश्रम, नागपूर महानगर नागपूर :- जिनको देश के लोगों ने पूर्वोत्तर की ‘रानी लक्ष्मीबाई’ कहां, जिनका भारत के स्वाधिनता आंदोलन में महत्वपूर्ण योगदान रहा और स्वतंत्रता के पश्चात भी धर्म संस्कृति रक्षा के भाव को जगाए रखा ऐसी पद्मभूषण रानी मां गाइदिन्ल्यू इनकी जन्मजयंती वनवासी कल्याण आश्रम द्वारा ‘नारी शक्ति दिवस’ के रूपमें मनायी जाती है। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com