रामटेक :- महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाअध्यक्ष पदी सुरेश वांदीले यांची नुकतीच रविभवन नागपुर येथे पार पडलेल्या एका बैठकीत नियुक्ती करण्यात आली. राज ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सुरेश वांदिले यांनी माहिती देतांना सांगितले.
रविभवन नागपुर ला मनसे पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. त्यात मनसे नेते अविनाश जाधव व संदीप देशपांडे यांच्या हस्ते सुरेश वांदिले यांना नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती करण्यात आली. यानिमित्याने वांदिले यांचा नुकताच रामटेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे संपूर्ण आडतिया एवं व्यापारी मंडळ यांच्या हस्ते सुद्धा जाहीर सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली करीता सुरेश वांदिले यांना शुभेच्छा देण्यात आल्या.