पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना भावपुर्ण निरोप..

नागपूर –  नागपूर (ग्रामीण), पोलीस दलातुन सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर (ग्रामीण), येथे दि ३१-०३-२०२३ रोजी निरोप देण्याकरीता आमंत्रित करण्यात आले. यावेळी एका ‘‘निरोप समांरभाच्या’’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त होणाऱ्या 1) उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग  मुख्तार बागवान, 2) उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग  नागेश विश्वनाथ  जाधव 3) पोलीस उपनिरीक्षक अश्पाक  अली बाकर अली चिश्तीया, श्वानपथक नागपूर ग्रामीण 4) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश कुंवर जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण 5) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप नामदेवराव इंगळे, पोलीस स्टेशन कोंढाळी 6) सहायक फौजदार  रमेशकुमार माधोराव भोयर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांना नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवून निरोप देण्यात आला आहे. तसेच सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षक  विशाल आनंद यांनी त्यांना पुढील आयुष्य  सुख समृध्दीचे व आरोग्य संपन्न राहावे अश्या  शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्ती नंतर त्यांचा कोणत्याही प्रलंबित कार्यालयीन कामकाजात अडथळा होणार नाही अशी ग्वाही पोलिस अधिक्षक यांनी यावेळी दिली. तसेच पोलीस दलातील सेवानिवृत्त पर्यंतचा कालावधी हा यशस्वीरीत्या पार पाडला याबद्दल त्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला नागपूर ग्रामीण येथील अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, पोलीस उप अधिक्षक (गृह)  संजय पुरंदरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रामझूला वाय शेप व नया लोहापुल का आज लोकार्पण

Sat Apr 1 , 2023
– केन्द्रीयमंत्री गडकरी करेंगे शुभारंभ,उपमुख्यमंत्री फडणवीस करेंगे अध्यक्षता,महा मेट्रो ने जटिल कार्य को साकार कर शहर के प्रति कटिबद्धता दर्शायी नागपुर:- रामझूला से एलआयसी चौक और आरबीआय चौक तक के वाय शेप उड़ान पुल एवं नए लोहापुल आरयूबी का लोकार्पण  १ अप्रैल २०२३ को शाम ५.३० बजे रामझूला के समीप होगा। केन्द्रीय मंत्री सड़क परिवहन और राष्ट्रिय महामार्ग नितिन गडकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com