सुख शांती समाधान संस्थे तर्फे वर्धापन दिन सोहळा संपन्न

– वर्धापन दिन सोहळा 

नागपूर :- नुकत्याच झालेल्या वर्धापन सोहळ्यात ९ मे रोजी, कविवर्य सुरेशभट सभागृह रेशिमबाग येथे सुख शांती समाधान संस्थेचा ११ वा, वर्धापन दिन सोहळा अतिशय आनंदात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथीचे स्थान गव्हरमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सदर, नागपूरचे प्रिन्सिपॉल दिपक कुलकर्णी यांनी भूषविले. सुख शांती समाधान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू सचिन माथुरकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. दीप प्रज्वलन आणि गायत्री मंत्र पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गणेश वंदना झाली. अतिथी आणि अध्यक्ष यांचा परिचय देऊन सत्कार करण्यात आला. नंतर वार्षिक अहवाल वाचन झाले. संस्थेतर्फे लघु गृहोधोगाला प्राधान्य मिळावे या हेतूने त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नृत्य आविष्कार याला सुरुवात झाली. एकूण १८ नृत्य ग्रुप होते. नंतर अतिथीचे मार्गदर्शन लाभले दीपक म्हणालेत की, अप्रतिम सोहळा रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर विनोद कामळी आणि अनिल गुरव सर्वांना सारखंच शिकविल्या नंतरही सचिन तेंडुलकरला चांगली संगत मिळाली म्हणून क्रिकेट जगतात नाव कमावू शकला आणि इतर दोघांनाही कमावू शकले कारण फक्त संगतीचा हा परिणाम आहे.

सचिन तेंडुलकरला भारतरत्न पदवी मिळाली आणि या सचिन माथुरकरला योगरत्न म्हणून म्हणतात. सुख शांती समाधान संस्थेचे मॅनेजमेंट खूप छान आहे. सगळे एकमेकांना समजून, कार्यक्रम करून, आनंदी आहेत. त्यांनी संस्थेला १०००० रू देणगी दिली. त्यानंतर सचिन माथुरकर म्हणाले की, वर्किंग टीम मेंबर्स कसे मिळून, मिसळून काम करतात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात याविषयी सांगितले. तसेच योग साधनाही करतात, जसे की फोटो मध्ये आपण कुठे आहो, कसे दिसतो, हे बघतो त्याचप्रमाणे आपण कोण आहोत, कसे आहोत, हे योगाच्या माध्यमातून आपण आपल्याला बघू आणि आत्म साक्षात्कार ह्या स्थिती पर्यंत पोहोचू. प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून उत्तम काम केल्याबद्दल संजय गोयल आणि सौ.रंजना कडू यांचाही सत्कार दादांनी केला. त्यानंतर निबंध स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा विषय योगणुषसनंम याचा निकाल जाहीर करण्यात आला.

निबंध स्पर्धा निकाल

नालंदा इगले, ज्योती गजभिये वर्षा मेंढे नृत्य कला स्पर्धा बंधूनगर झिंगाबई टाकळी कामठी भागुबाई समाज भवन कामठी गायत्री उपवन पोरवाल पार्क येथे पाहुण्यांनी बक्षीस देऊन सर्वांना सन्मानित केले. या सुंदर कार्यक्रमाचे संचालन हर्षा पाटील आणि मीरा रायपूर, बाबिता कामठी यांनी खूपच सुंदर केले. आभार रंजना कडु हिने मानले. या यशस्वी कार्यक्रमात संस्थेची पूर्ण टीम सहभागी होती. त्यानंतर संपूर्ण लोकांसाठी भोजन व्यवस्था होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा परिषदेंतर्गत रद्द पदभरतीचे परिक्षा शुल्क परत मिळणार

Tue May 14 , 2024
– उमेदवारांनी माहिती अद्यावत करण्याच्या सूचना गडचिरोली :- जिल्हा परिषद अंतर्गत मार्च-2019 व ऑगस्ट-2021 मधील गट-क व आरोग्य विभागाच्या पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2022 अन्वये रद्द करण्यात आली आहे. या पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दि. 5 सप्टेंबर 2023 पासुन सुरु करण्यात आली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com