संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 16:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आनंद नगर येथे एका अविवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री 9 वाजेदरम्यान केले असून मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ दामोदर ठवरे वय 40 वर्षे रा आनंदनगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाचे आई वडील मरण पावल्याने व बहिणींचे लग्न झाल्याने हा एकल कुटुंब पद्ध्तीने वास्तव्यास होता.व्यवसायाने प्लंबर चे काम करीत असून दररोज बहिणीच्या घरून जेवणाचा डबा मिळायचा .यानुसार काल सुदधा मृतकाचा भाचा हेमंत हा जेवणाचा डब्बा घेऊन मृतकाच्या घरी पोहोचला असता सदर मृतक हा घराच्या छताच्या लाकडी बल्लीला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या स्थितीत आढळून आल्याने एकच धक्का बसला यावेळी घरी कुणीही नसल्याचे संधी साधत मृतकाने अज्ञात कारणावरून गळफास केला असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नसून घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी संजय पिल्ले, राजीव टाकळीकर यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी च्या शवविच्छेदन गृहात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी आकस्मिक घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
अविवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com