बीकेसीपी स्कुल कन्हान सुहासिनी शुक्ला ला ९५.४० % .
कन्हान : – माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२२ इयत्ता १० वी निकाल घोषित झाला असुन पारशिवनी तालुक्यातुन बीकेसीपी स्कुल कन्हान ची सुहासिनी शुक्ला हिने ९५.४० गुण प्राप्त करून तालुक्यातुन प्रथम क्रमाकांवर आली आहे.
बीकेसीपी स्कुल कन्हान १०० %
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२२ च्या इयता १० वी चा शुक्रवार (दि.१७) जुन ला निकाल घोषित झाला. यात बीकेसीपी स्कुल कन्हान चे १०७ पैकी १०७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा १०० % निकाल लागला असुन ७४ विद्यार्थ्याना डिस्टी केशन, २२ विद्यार्थ्यानी ९० % च्या वर तर २९ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ०४ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतुन व तालुक्यातुन प्रथम कु सुहासिनी शुक्ला ९५.४०%, व्दितीय कु विधी ऊके ९५.२०%, तृतीय हर्षल बुटोलिया ९४.८०%, चतुर्थ संकल्प पशीने ९४. ६०%, पाचवी कु इशिका यादव ९४.२०% गुणाक्रमा ने उत्तीर्ण झाले आहे. हे सर्व शाळा व्यवस्थापनाने आखलेली उत्कृष्ट धोरणे, शिक्षक कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यां च्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे.
धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान ९७.०९ %
धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान या शाळेतुन १७३ पैकी १६७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा ९७.०९ % निकाल लागला. यात प्रथम आयुष संजय सोनेकर ९० %, व्दितीय एकता तुषार मुरकुटे ८९% , तृतीय खुशी पुरुषोत्तम दहेकर ८७.२० %, श्रेया सुनील घोडेस्वार ८७.२० %, दिव्यानी दिलीप ढोले ८४.८० %, मानसी मोरेश्वर ठाकरे ८३.८० %, खुशी सुरेश टेंभुणे ८२.८० %, साक्षी तुळशीराम पाहुणे ८१.६० %, आकांक्षा महेश बिसने ८०.६०%, अंजु सुरेश वाटकर ८१ % गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहे.
बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान ९७.३६ %
बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान चा ९७.३६ % निकाल लागला असुन प्रथम कु. अपेक्षा मिलींद रंगारी ९२.८ %, व्दितीय कु. रिया वडे ९१.६ %, कु.जान्हवी ताराचंद कुरडकर ९१.६ , तृतीय कु.साक्षी जुगेश गेडाम ८९.६ %, कु.कांचन उत्तम कावडकर ८९.२ % गुणाक्रमाकांने विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशवंत विद्यालय वराडा १०० %
या शाळेतुन एकुण २२ विद्यार्थी पैकी २२ ही उत्तीर्ण झाल्याने शाळेचा १०० % निकाल लागला असुन कु करिष्मा वानखेडे केरडी च्या विद्यार्थीनी ८०.४० % प्राप्त करून शाळेतुन प्रथम, कु. वैशाली सयाम ७५.४० % व्दितीय, कु. सेजल ठाकरे ७३.४० % गुण प्राप्त करून तृतीय क्रमाक पटकाविला आहे.
सरस्वती न्यु इंग्रलीश हायस्कुल कन्हान १०० %
शाळेचा शंभर टक्के निकाल लागला. यात प्रथम मयुरेश रतन रेखाते ९२.२० %, दृतीय कु.अनुष्का धनराज चकोले ८६ % , तर तृतीय कु.परी पलाश राजबन्सी ८६ % गुणानु क्रमाकाने उत्तीर्ण झाले आहे.
आदर्श हायस्कुल (हिंदी माध्य) कन्हान ९०.९० %
आदर्श शाळेतुन एकुण ५५ विद्यार्थ्यानी परिक्षा दिली यात ३२ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले. शाळेचा ९०.९०% टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम कु.दिव्यानी जगदीश काकडे ८५.४० टक्के, व्दितीय मेघा चंदु ठाकरे ८१.८० टक्के तर तृतीय कशीश अंकुश बजानगाटे ८०.८० टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहे.
श्री नारायण विद्यालय कन्हान (इंग्रजी माध्य) १००%
शाळेतुन प्रथम इमान फातेमा तारिक परवेझ ९०.८० % , व्दितीय युसूफ जावेद ९१.६० %, तृतीय हिमांशु संजय आंबिलढुके ९०.२० %, तर ज्योतिर्मय प्रकाश निकोसे ९०%, प्राची विजय सोनेकर ९० %, आचल अरविंद श्रीवास्तव ९०.८ %, विलास रंगारी ८८.६० %, रागिणी नंदकिशोर टेभरे ८८.२२ %, संकेत राजेंद्र गाडे ८९ %, सेजल चक्रधर कुल्लरकर ८८ %
श्री नारायण विद्यालय कन्हान (हिंदी) १०० %
शाळेतु प्रथम कु. निकिता श्रीश्याम तिवारी ९० % , व्दितीय कु. सुमेश्वरी छोटेलाल राजपुत ८५.६० %, तृतीय कु. निधी धर्मेंद्र पांडे ८५.६० %, तर कु. काजोल सुभाष ढोके ८४.६० % अश्या चांगल्या गुणानु क्रमाकांने विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने संस्थेचे अध्यक्ष एन बाबुजी नानन, श्री नारायण विद्यालय (इंग्रजी माध्यम) कन्हान च्या मुख्याध्यापिका कु. अर्चना शैलेश यादव व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.