खऱ्याचे पैसे मागितल्याने आरोपीं चाकु मारताना बीच बचावात बहीण जख्मी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

बाबु कुरेशी च्या तक्रारीने पोस्टे कन्हान ला तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी दिवसे दिवस वाढत असुन तारसा चौक येथील बाबु पान पॅले स पानठेल्यात खर्रा घेण्याकरिता आलेल्या तीन युवका ना बाबु कुरेशी ने खऱ्याचे पैसे मांगितले असता सोनु गुप्ता ने शिवीगाळ करित चाकु काढुन मारित असता ना बीच बचावात आलेल्या बहीणीला चाकु लागुन व बाबु कुरेशी ला लाकडी दंडा व दगड मारून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी बाबु कुरेशी च्या तक्रारीने पोस्टे कन्हान ला तिन्ही आरोपी युवका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.

प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.१६) ऑक्टों बर ला दुपारी २.१५ वाजता मुस्तफा उर्फ बाबु यार मोहम्मद कुरेशी हा आपल्या बाबु पान पॅलेस पान ठे ल्यात खर्रा बनवित असुन त्याची बहीण जायदा बानो हे आपल्या बांगडी च्या दुकानात बसली होती. तेव्हा बाबु कुरेशी च्या पान ठेल्यात सोनु गुप्ता, सागर चव्हा ण, अमित चौव्हाण हे तिघेही आले. सोनु गुप्ता याने पाच खर्रे मागितले असता मुस्तफा उर्फ बाबु कुरेशी याने सोनु गुप्ता ला म्हटले कि ” मै फ्रि मे खर्ररे नही देता, कल भी तिनो को मैने फ्री में खर्ररे दिये थे, मुझे खर्ररे के पैसे दे दो ” असे म्हटले असता सोनु गुप्ता, सागर, अमित यानी बाबु कुरेशी ला म्हटले कि, ” हमसे पैसे मांग रहा, जा तेरे पैसे नहीं देते ” असे म्हणुन सोनु गुप्ता बाबु कुरेशी ला शिवीगाळ करू लागल्याने बाबु याने सागर गुप्ता ला म्हटले कि, तु शिवीगाळ नको करू, असे म्हटल्याने सोनु गुप्ता याने चाकु काढुन कुरेशी ला मारायला धावला असता त्याची बहिण जायदा बानो ही बीच बचावास धावली असता तिचा हाताला चाकु लागला. सागर चौव्हाण याने कुरेशी ला लाकडी दंड्याने डाव्या हातावर मारले असुन अमित चौव्हाण याने गोटा फेकुन मारपिट करून तिघांनी बाबु कुरेशी व त्याच्या बहीणीला जिवाने मारण्याची धमकी देऊन पळाले. बाबु ला मार असुन बहिणी च्या हाता तुन रक्त निघत जख्मी झाल्याने कन्हान पोस्टे ला गेले असता पोलीसांनी दोघाना प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे प्राथमिक उपचार करून कामठी उपजि ल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. फिर्यादी मुस्तफा उर्फ बाबु यार मोहम्मद कुरेशी राह. रायनगर कन्हान यांच्या तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला आरोपी १) सागर गुप्ता, २) अमित चौव्हाण दोघे राह. हरिहर नगर कांद्री व ३) सागर चौव्हाण राह. इंदिरा नगर कन्हान यांचे विरुद्ध कलम ३२४ , ५०४ , ५०६ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com