रक्ताच्या उलट्या झाल्याने तरुणाचा तडकाफडकी मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ रहिवासी 32 वर्षीय विवाहित तरुणाचा रक्ताच्या उलट्या होऊन तडकाफडकी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 9 वाजता घडली असून मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ राजकुमार वाहने असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असून मोलमजुरीचे कामे करीत असे मागील काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त होता.मात्र 6 डीसेंबर प्रकृती जास्तच खालावली होती दरम्यान औषधोपचार सुरूच असता आज सकाळी अचानक रक्ताच्या उलट्या होत जीव कासावासा होत होता.घरमंडळींनी लगेच उपचारार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोवर सदर तरुणाचा जीव गेला होता.उपस्थित वैद्यकीय अधिकारी ने तपासून मृत घोषित केले.सदर मृतक तरुणाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नमो महारोजगार मेळाव्यात तरुणांनी सहभागी व्हावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fri Dec 8 , 2023
नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासोबतच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे दि. ९ व १० डिसेंबर 2023 रोजी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात, ‘स्टार्टअप एक्सपो’ ही भरविण्यात येणार असून या आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com