संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील तेलिपुरा भागातील रहिवासी एका इसमाचा राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी 5 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव नंदेश गोपीचंद वाघमारे वय 45 वर्षे रा येरखेडा कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले,।मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नसून पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.