नागपूर :-प्रयास जैन कलार ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने व जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ (केंद्रीय व जिल्हा समिती, नागपुर) जैन कलार सेवा समिती, “प्रयास” आणि समाजातील विविध सक्रिय संघटनेच्या विशेष सहकार्याने कोजागिरी पौर्णिमा समारंभ कार्यक्रम उमरेड मार्ग, रेशिमबाग, नागपुर स्थित जैन कलार लॉन येथे यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.
आयोजनाचे कार्यक्रम अध्यक्ष चंद्रशेखर आदमने (जैन कलार समाज न्यास अध्यक्ष), शशिकांत समर्थ (प्रयास अध्यक्ष) आणि श्रीकांत शिवणकर (जिल्हा समिती अध्यक्ष) यांनी यशस्वी आयोजनाकरिता मोलाचे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संयोजक किरण गोसेवाडे अध्यक्ष प्रयास जैन कलार ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि सहसंयोजकांच्या मार्गदर्शनात नियोजनबद्ध कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. या प्रसंगी समाजातील उपस्थित महिलांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले आणि रजनी चिमुरकर व कुसुम भरणे यांनी आई सरस्वती च्या प्रतिमेला माल्यार्पण केले. ग्रीष्मा रणदिवे ने श्रीगणेश वंदन नृत्य माध्यमातून अप्रतिम सादरीकरण करीत समाजातील कलावंतांनी ३० विविध सादरीकरण जसे गायन, नृत्य आणि एकपात्री नाटिका प्रस्तुत करण्यात आल्यात तसेच समाजातील ज्येष्टांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुछ प्रदान करीत सत्कार ही करण्यात आला.
आयोजकांच्या वतीने कार्यक्रमअंती कोजागिरीचे दूध वितरित करण्यात आले.
आयोजनाला सर्वश्री यादवराव शिरपूरकर, विलास हरडे, रविकांत हरडे, किरण गोसेवाडे, विनोद खानोरकर, संजय खानोरकर, अरुण खानोरकर, शैलेश दहिकर, संजय शिरपूरकर, मोरेश्वर मानापुरे, मिलिंद मानापुरे, दिलीप पलांदुरकर, रमेश लांजेवार, हरिभाऊ हटवार, गणेश दुरुगकर, प्रदीप हरडे, भूषण हरडे, पराग डांगे, राजेश वारोतकर, रजनी चिमुरकर, स्वाती शिरपूरकर, संगीता दहीकर, मनीषा मानापुरे, रश्मी शिवणकर, ममता स्वप्निल समर्थ आणि प्रख्यात वृत्त निवेदिका सुरभी शिरपूरकर सह इतर समाज मान्यवरांची प्रामुख्याने सक्रिय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका वारोतकर व वनिता मोटघरे तर आभार प्रदर्शन कुसुम भरणे यांनी हाताळले व आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्वश्री. राजेंद्र वारजूरकर, प्रकाश मासूरकर, अरुण खानोरकर, मदन हरडे, प्रदीप पालटकर, दामोधर आदमने, अरुण राहटे, नंदाताई हरडे, राजेश समर्थ, कादंबरी बांगडकर, मंदार बांगडकर, सुबोध पेशने, शिवम पलांदूरकर, स्वप्निल समर्थ व इतरांनी विशेष श्रम घेतलेत.