प्रतापनगर विद्यालयात आंतरशालेय व्हाॅलीबॉल स्पर्धेचे सफल आयोजन 

नागपूर : प्रतापनगर शिक्षण संस्थेच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्ताने प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सोमवारी समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय आंतरशालेय व्हाॅलीबॉल स्पर्धेचे सफल आयोजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण २५ संघाने सहभाग नोंदवला. सकाळी उद्घाटनीय कार्यक्रमात समाजसेवक विनय आंबुलकर यांच्या हस्ते स्पर्धेचे रीतसर फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी छत्रपती पुरस्कार विजेते पियुष आंबुलकर, राज्य हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष सुनील हांडे, प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, सचिव अनुपमा नाफडे,उपाध्यक्ष शंकर पहाडे, सदस्य प्रशांत वैद्य,श्रीराम महांकाळीवार,मुख्याध्यापक मंजुश्री टिल्लू,श्रावण सुरकार इत्यादी उपस्थित होते.

दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघात बनारसीदास रुईया हायस्कूल,काटोल विजेता ठरला असून टी.बी.आर.ए.मुंडले,हायस्कूल नागपूर संघाने उपविजेते पद प्राप्त केले.तर मुलींच्या संघात म्युनिसिपल हायस्कूल, कळमेश्वर यांनी बाजी मारली असून टि.बी.आर.ए.मुंडले हायस्कूल नागपूर हा उपविजेता संघ हा ठरला आहे.१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघात म्युनिसिपल हायस्कूल,कळमेश्वर विजेता ठरला असून टि.बी.आर.ए.मुंडले हायस्कूल नागपूर संघाने उपविजेते पद प्राप्त केले. तर मुलींच्या संघात टि.बी. आर.ए.मुंडले हायस्कूल नागपूर यांनी बाजी मारली असून म्युनिसिपल हायस्कूल,कळमेश्वर हा उपविजेता संघ हा ठरला आहे.१४ वर्षे वयोगटात उत्कृष्ट खेळाडू अनुक्रमे हिमांशू गाढवे बनारसीदास रुईया हायस्कूल काटोल व अक्षरा नगराळे म्युनिसिपल हायस्कूल कळमेश्वर हे ठरले,तर १७ वर्षे वयोगटात उत्कृष्ट खेळाडू अनुक्रमे कनिष्का चाफले बी.आर.ए.मुंडले हायस्कूल व पवन भुसारी म्युनिसिपल हायस्कूल,कळमेश्वर हे ठरले.

समारोपिय कार्यक्रमात प्रा.अजय निलदावार यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघा सह उत्कृष्ट खेळाडूंना रोख पारितोषिक,सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक विजय वानखेडे यांनी तर आभार पवन नेटे, रंजना बोरकर यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता समर्थ व्यायाम शाळेचे सौरभ रोकडे,भाग्यश्री रोकडे पाटील इं. पदाधिकार्यां सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

५ हजार नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे उद्दिष्ट - वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ

Wed Nov 23 , 2022
चंद्रपूर :- स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभागातील ५ हजार नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचे उद्दिष्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळाने ठेवले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ सहभागी असून स्पर्धेअंतर्गत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वात तुकुम प्रभागात स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे.  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com