सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे निर्वाह भत्ता

यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील सावंगी येथील ईश्वर देशमुख सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने मॅट्रिकपुर्व सैनिक शाळा निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांनी बेव लिंकद्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपुर्व सैनिक शाळा निर्वाह भत्ता योजना शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी https://prematricdbtworkflow.mahait.org/ या महाडीबीटी प्रणालीव वेब लिंकद्वारे अर्जाची नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

@ फाईल फोटो
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नैसर्गीक आपत्तीच्या निकषान्वये पिक विमा भरपाई मिळणार

Mon Jul 8 , 2024
यवतमाळ :- मागील वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीच्या केलेल्या पंचनाम्यानुसार विमान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले होते. या विरोधात कंपनीने अपील दाखल केले होते. अपिलात पंचनाम्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या निकषाप्रमाणे भरपाई मिळणार आहे. सन 2023-24 मध्ये जिल्ह्यात पिक विमा न मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com