मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले रामनगर मनपा शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत 

– शाळेच्या पहिल्या दिवशी सदिच्छा भेट देऊन घेतला आढावा 

नागपूर :  रामनगर येथील मनपा व आकांक्षा फाउंडेशन व्दारा संचालित इंग्रजी प्राथमिक शाळेला मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दि. २९ जून, बुधवारला शाळेच्या प्रथम दिनी भेट देऊन नवागतांचे स्वागत केले. उन्हाळी सुट्ट्यांनंतर बुधवारी शाळेच्या प्रथम दिवशी मनपा आयुक्तांनी इंग्रजी माध्यम प्रथम इयत्तेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, गणवेश, पाठयपुस्तके देऊन स्वागत केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, कमलेश चव्हाण, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, शिक्षण विभाग समन्वयक विनय बगले, आकांक्षा फाउंडेशनचे शालेय संचालक सोमसुर्व चॅटर्जी आणि शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

व्यापारी बांधवांची अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा

Thu Jun 30 , 2022
प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भातील शंकांचे केले निराकरण नागपूर : केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे जारी अधिसूचनेनुसार नागपूर शहरात १ जुलैपासून नमूद सिंगल यूज प्लास्टिक पूर्णत: बंदी लावली जाणार आहे. प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात शहरातील व्यापारी बांधवांनी बुधवारी (ता.२९) मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांची भेट घेउन चर्चा केली व आपल्या शंका आणि प्रश्न मांडले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com