संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7:- जीवाचे रान करून केलेल्या अभ्यासातून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत .अभ्यास करण्याची सवय ठेवा. अभ्यासातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना अभ्यासातून कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा असे आवाहन माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी केले.
कामठी येथील गांधी चौक, पोरवाल पार्क जवळील स्व.राजीव गांधी सभागृहात इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शाळा , महाविद्यलयीन मुख्याध्यापक , शिक्षकांचा भव्य सत्कार कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात विदर्भ झोन चे युनिट मॅनेजमेंट चे समन्वयक व युवक कांग्रेस चे पदाधिकारी मो इर्शाद शेख यांच्या वतीने करण्यात आले होते .यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर, युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते गुणवन्त विद्यार्थीना भव्य ट्राफि व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच मुख्याध्यापकाना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी असोसिएशन ऑफ फार्मेसियुटिकल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रा डॉ मिलिंद उमेकर यांची निवड झाल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी दहावी व बारावी नंतर काय याबाबत उपस्थित विद्यार्थी , पालकाना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरविण्याची जवाबदारी शाळा, विद्यार्थी व पालक या तिघाचीही आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुढील प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या . प्रत्येक क्षेत्रात संधी आहे ती शोधता आली पाहिजे त्यातुन योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे . वडिलांचे स्वप्न व तुमची म्हत्वाकांक्षा याची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे . मोबाईल मधील इंटरनेट चा वापर शैक्षणिक प्रगतीसाठी करा,आपल्यातील आत्मविश्वास जागृत करा,योग्य ती संधी आपल्या पुढे चालत येईल असे मौलिक मार्गदर्शन केले.तसेच एम एम रब्बानी शाळेचे माजी प्राचार्य राजेश बनसिंगे, व डॉ मिलिंद उमेकर यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कामठी शहर कांग्रेस कमिटी शहराध्यक्ष कृष्णा यादव, राजकुमार गेडाम, कामठी नगर परिषद च्या माजी उपाध्यक्ष शाहिदा कलिम अन्सारी,माजी नगरसेविका ममता कांबळे,माजी नगरसेवक नीरज लोणारे , धीरज यादव, आकाश भोकरे, आशिष मेश्राम, करार हैदर,माजी ग्रा प सदस्य अनिल पाटील ,ओमप्रकाश कुरील ,मनोज यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन तसेच आभार कार्यक्रमाचे आयोजक विदर्भ झोन चे युनिट मॅनेजमेंट चे समन्वयक व युवक कांग्रेस पदाधिकारी मो इर्शाद शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर जिल्हा युवक कांग्रेस चे उपाध्यक्ष मो राशीद अन्सारी, मो सलमान खान, करार हैदर, अफसर खान, इरफान अहमद, आकाश भोकरे, दिवाकर राव,फरमान खान, अरशद खान आदींनी केली.