भारत आणि बांगलादेशातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी बौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 21 : भगवान गौतम बुद्ध यांनी देशाला व जगाला शांती व प्रेमाचा संदेश दिला. भारत व बांगलादेश या देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी बौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.  

राज्यपाल कोश्यारी यांच्या  हस्ते बांगलादेशातील सर्वोच्च संघ परिषदेचे १३ वे संघराजा व बांगला भाषेतून थेरवाद बुद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी अविरत प्रयत्न करणारे डॉ. ज्ञाननश्री महाथेरा यांना शनिवारी (दि.२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलात्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. 

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघ व बौद्ध धम्म अनुयायी महासंघातर्फे महाथेरा यांना सदर पुरस्कार देण्यात आला.

यावेळी साधनानंद थेरोराहुल रत्नउपासक रवी गरुडघनश्याम चिरणकरबौद्ध धम्म विचार प्रसाराचे आशिया खंडाचे निमंत्रक राजेंद्र जाधव व जनसंपर्क अधिकारी हेमंत रणपिसे प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोराडी वीज केंद्रात रोग निदान आणि योग शिबिराचे आयोजन

Tue Jun 21 , 2022
नागपुर – औष्णिक विद्युत केंद्र कोराडी येथे नुकतेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षार्निमित्य आयोजित करण्यात आलेल्या श्रमश्री सूनेत्र प्रकल्पा अंतर्गत ४० वर्षावरील कंत्राटी कामगार विमेदारांसाठी राज्य कामगार विमा योजना रूग्णालय, नागपुर तर्फे नि:शुल्क रोग निदान शिबीरचे आयोजन करण्यात आले. कंत्राटी कामगारांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी ह्या आरोग्य शिबीरचे आयोजित करण्यात आले. या शिबीरात १५० कंत्राटी कामगार विमेदारासाठी नेत्र तपासणी,रक्त तपासणी, हदय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com