संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘नागपूर करांसाठी कलंक’असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचे हे वागबाण बोलणे भाजपच्या जिव्हारी लागल्यामुळे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांत संतापाची लहर पसरली असून उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे ‘ त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या निषेधार्थ कामठी तालुक्यातील गुमथळा येथे भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान यांच्या मुख्य उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निषेध घोषणा करण्यात आल्या.
याप्रसंगी नरेश मोटघरे, किरण राऊत, योगेश डाफ, सेवक उईके, दिलीप मुळे, पुनम माळोदे,सरपंच लक्ष्मण करारे, प्रणिला डाफ, सचिन डांगे, ऋषीजी भेंडे, निलेश खांडेकर, शेषराव वानखेडे, सुरेश ढोले ,राहुल बोडारे, पदाधिकारी भगवान निदान, कमलाकर ठाकरे, नाना कुहीटे, गणेश इंगोले, विक्की काशीमकर ,शिवा घाटोळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.