संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- होळी व धुळीवंदन सणाच्या औचित्यावर कामठी तालुक्यात अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात राहून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वक्रदृष्टी ठेवण्यात आली.
..होळी व विशेषता धुळीवंदनच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रुटमार्च सुदधा काढला होता. मद्यप्राशन करून दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवितात तसेच रोडने रॅश ड्रायव्हिंग,स्टंटबाजी सारख्या कृत्य करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी, पेट्रोलिंग व पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.दरम्यान होळी पर्व मोठ्या उत्साहात इको फ्रेंडली वातावरणात पार पडला .यासाठी डीसीपी श्रवण दत्त,एसीपी नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर, गुन्हे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, वाहतूक पोलीस निरीक्षक गोसावी,जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यासह कर्तव्यावर असलेल्या समस्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.