संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी
चार महिन्यांचा थकीत पगार करण्याची मागणी
कंपनी व्यस्थापनाकडून कामगारांची पिळवणूक
पगार द्या नाहीतर, विष घ्यायची परवानगी द्या
जगावे कि मरावे अशी कामगारांची परिस्थिती व मनस्थिती
नागपूर/29 एप्रिल :- आशिया खंडातील सर्वात मोठी औधोगिक वसाहत असलेल्या बुटीबोरी पंचतारांकित औधोगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्सटाईल्स कंपनी व्यवस्थापनाने कंपनीतील स्थायी व अस्थायी कामगारांचा गत चार महिन्यांपासून पगार न दिल्यामुळे, बोनस, ले ऑफ वेतन न मिळाल्यामुळे, कामगारांना 26 दिवस काम न देऊन मानसिक त्रास देत असल्यामुळे व निलंबित कामगारांना कामावर न घेत असल्यामुळे कामगारांनी गत 13 दिवसांपासून व्यवस्थापनाकडे आपल्या विविध मागण्यासह चार महिन्यांचा थकीत पगार करण्याची मागणी करत दि 17 एप्रिल पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.या कामबंद आंदोलनात स्वतःच्या न्याय हक्कासाठी जवळपास दोन हजारावर महिला पुरुष कामगार धरणे आंदोलनावर बसले आहे.
यापूर्वीही येथील स्थायी व अस्थायी कामगारांनी 4 एप्रिल 2022 ला व 29 नोव्हे 2021 ला कामबंद आंदोलन केले होते.तर दि 02 ऑक्टो 2022 ला वेना नदीच्या पात्रात जल समाधी आंदोलन केले होते.त्यावेळी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी संजय धात्रक,बुटीबोरी पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी मध्यस्थी करून आंदोलनाला विराम दिला होता.
बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात मोरारजी टेक्सटाईल्स कंपनी ही धागा व कपडा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.या कंपनीचे उत्पादन हे विदेशातही निर्यात केले जात असून त्यातून कंपनीला उत्तम नफा मिळत असतो.परंतु कंपनी व्यवस्थापनाने येथील स्थायी व आस्थायी कामगारांचा गत चार महिन्यापासून वेतन दिला नसल्यामुळे कामगारांवार उपासमारीची पाळी आली आहे.
महत्वाची बाब अशी की, कंपनीत काम करणारे अनेक स्थायी व आस्थायी कामगार हे बाहेरगावाचे असून ते किरायाच्या खोलीत राहतात.त्यांना कंपनी कडून अगदी नगण्या व तुटपुंजा पगार मिळतो. त्या पगारात ते घराचा किराया,मुलांचे शिक्षण व परिवाराचा उदरनिर्वाह करून लाचारीचे जीवन जगतात. पगार झाला कि चार दिवसात लोकांचे देणेघेणे करून पाचव्या दिवशी गाठीला एक छादाम् हि उरत नसतो. अशात कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना चार महिन्यांपासून पगार न दिल्याने “जगावे कि मरावे”अशी कामगारांची परिस्थिती व मनस्थिती झाली असून एक तर आम्हाला पगार द्या नाहीतर विष घ्यायची परवानगी द्या अशी केवीलवानी मागणी कामगार करीत आहे.
विशेष बाब अशी की, कंपनी व्यवस्थापन व कामगार यातील या समस्या वर्षानुवर्षे सुरू असून यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी राज्याचे माजी जलसंपदा,शालेय शिक्षण महिला बालविकास व कामगार मंत्री बच्चू कडू यानी दि 2 फेब्रु 2021 ला अप्पर कामगार आयुक्त,वी रा पाणबुडे,सरकारी कामगार अधिकारी संजय धात्रक तसेच मोरारजी टेक्सटाईल्स चे जनरल मॅनेजर तुषार व्यवहारे,आय इ सी व ए व्ही एम चे संचालक सुबोध मोहिते,एच आर मॅनेजर प्रकाश शर्मा यांच्याशी बैठक घेण्यात आली होती.या समन्वय बैठकीत कामगारांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करून त्या पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु मोरारजी टेक्सटाईल्स कंपनीच्या आडमुळे धोरणामुळे कामगारांच्या मागण्या पूर्ण न करता कामगार मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली होती. त्यानंतर माजी राज्य कामगार मंत्री बच्चू कडू यांनी दि 1मे 2022 ला बुटीबोरी येथे कामगारांचा आनंद कामगार मेळावा घेऊन कामगारांचे भोंगे बंद पडू देणार नाही अशी घोषणा हि केली होती परंतु त्यानंतर 2 ऑक्टो 2022 ला मोराराजी कंपनीचा भोंगा बंद पडला व आता सुद्धा तो बंदच असून कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाला याचे काहीही सोयारसुतक नसल्याचे दिसून येते.