अंबाझरी तलावाचे बळकटीकरण, मजबुतीकरण कामाबाबत आयुक्त कक्षात बैठक

नागपूर :- शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावाचे बळकटीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या कामासंदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

मनपा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात पार पाडलेल्या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त, आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, नागपूर पाठबंधारे विभाग (दक्षिण) चे मुख्य अभियंता पवार, अधीक्षक अभियंता, डॉ. श्वेता बनर्जी, मुख्य लेखा अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त रवींद्र भेलावे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूरचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अंबाझरी तलावाच्या बळकटीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी अंबाझरी आउटलेट आणि पुढील ५० मीटर परिसरातील पाणीच्या प्रवाहाला होणारी अडचण, अंबाझरी धरण परिसरातला धोका, परिसारत असणाऱ्या वृक्षांची माहिती जाणून घेतली. तसेच तांत्रिकबाबी आणि इतर कार्याबाबत पाठबंधारे विभागामार्फत बळकटीकरण आणि मजबुतीकरण या संदर्भात डिझाईन तयार करू घ्यावे असे निर्देश दिले. अंबाझरी परिसारत असणाऱ्या वृक्षांची माहिती जाणून घेण्याकरिता अतिरिक्त आयुक्त (शहर), मुख्य अभियंता पाठबंधारे विभाग, मनपाचे उद्यान विभागाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी यांचा समावेश असणारी लहान समिती स्थापन करावी आणि या समितीने पुढील १५ दिवसात आपला अहवाल सदर करावा असे निर्देशही डॉ. चौधरी यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कॉर्समुळे जमिनीची अचूक मोजणी शक्य

Fri Oct 6 , 2023
Ø विभागात 12 जीपीएस सेंटर कार्यान्वित   Ø मोजणीचे नकाशे रियल टाईममध्ये अचूक मिळणे शक्यhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- जमीनीच्या मोजणीमध्ये अचूकता येण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या मोजणीचे नकाशे अक्षांस व रेखाशांसह तयार करण्यासाठी कॉर्स अर्थात निरंतर संचालन संदर्भ केंद्राची राज्यात 77 ठिकाणी उभारणी झाली आहे. त्यापैकी 12 कॉर्स केंद्र नागपूर विभागात सुरु झाले आहेत. कॉर्सच्या उभारणीमुळे वैश्विक स्थान निश्चिती (जीपीएस) आणि नकाशे तयार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com