संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कामठी येथे आज 19 जानेवारीला कामठी बस स्थानक परिसरात ‘ बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूरचे नंदलाल राठोड तर विभाग कांचन वाणी कामगार कल्याण अधिकारी गट क्रमांक एक यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रोशन खुरगे वाहतूक नियंत्रण कामठीचे विशेष उपस्थिती होती तर आताऊल्ला खान व चालक गोर वाहक ज्यांनी या कार्यक्रमांमध्ये बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर पथनाट्य सादर केले तर रोशन खोब्रागडे, समीर दंडाले, प्रसन्न अनुनी, नितीन विजय पोलकमवार, प्रकाश धनवटे आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे संचालन हेमंत जौँजल यांनी केले .आभार शुभदा गळगटे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नलिनी मेहर शिशु मंदिर आया यांनी प्रयत्न केले.