दुकानाचे शटर तोडुन ५९,१५३ रुपयांचा मुद्देमाल चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- शहरातील शहिद चौक साई काॅम्पलेक्स येथील माया सेल्स दुकानाचे शटर तोडुन अज्ञात चोरट्यांनी ५९,१५३ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.६) मार्च ला रात्री ९:३० वाजता दरम्यान चंद्रकांत प्रकाश चावला वय ४८ वर्ष रा. कामठी हे आपल्या दुकानाचे शटर बंद करुन दोन्ही साईडचे कुलुप लावुन घरी गेले. गुरूवार (दि.७) मार्च ला सकाळी ७ वाजता दरम्यान ग्राहक अश्विन रा. कन्हान याने दुकानदारा ला फोन करुन सांगितले कि तुमच्या दुकानात रिकाम्या अंड्याचे ट्रे परत करायला आलो आहे आणि तुमच्या दुकानाचे शटर थोडेसे उघडे आहे. अश्या माहितीने दुकानादाराने आपल्या दुकानात पोहचुन पाहणी केली असता दुकानाचा शटर थोडासा उघडा दिसला, मात्र शटर बंद करतांना लावलेले कुलुप तसेच असल्याचे आढळुन आले. दुकानदाराने आत मध्ये जाऊन पाहणी केली असता गल्यात ठेवलेले रोख २६,००० रु. ज्यामध्ये १००, ५०, २०, १० रुपयांचे बंडल बनवले होते आणि चिल्कर पैसे १५००० रु. ज्यात १०, ५ रुपयांचे सिक्के होते व वेगवेगळ्या कंपनीच्या सिगरेट किंमत १८,१५३ रु. असा एकुण ५९,१५३ रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी चंद्रकांत चाव ला यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. १९९/२४ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाख ल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्योजकांनी स्थानिक रोजगार व हिताला प्राधान्य द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Fri Mar 8 , 2024
– विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार – 7 हजार 384 रोजगाराच्या नवीन संधी नागपूर :- राज्याचे धोरण उद्योगस्नेही आहे. विविध उद्योगांसाठी गुंतवणूक वाढीचे मार्ग प्रशस्त व्हावेत याचबरोबर लहान-मोठ्या प्रकल्पांच्या विस्तारासाठी तत्पर सहकार्याची भूमिका शासनाने घेतली आहे. उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून अधिकाधिक प्रमाणात स्थानिक रोजगार आणि हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. वनामती येथील सभागृहात जिल्हास्तरीय उद्योग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com