संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
अवैधरित्या दारू विक्री करताना १९७९० रू ची दारू पकडुन ७ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पान व चाय टपरी वर बिनधास्त अवैद्यरित्या देशी, विदेशी विक्री सुरू असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने पेट्रोलिंग दरम्यान कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील गोंडेगाव, टेकाडी, गाडेघाट, कोळसा खदान नं. ३ व खदान नं. ४, पिपरी व कन्हान या पाच स्थळी छापा मारून १९७९० रूपयाची देशी, विदेशी दारू पकडुन सात आरोपी विरूध्द मुंबई दारू बंदी कायदा अंतर्गत कारवाई करून पुढीस कारवाईकरिता कन्हान पोलीसाच्या सुपुर्द करण्यात आले आहे.
रविवार (दि.६) नोव्हेंबर २०२२ ला स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने पेट्रोलिंग दरम्यान कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई दारू बंदी कायदा अंतर्गत पाच स्थळी छापा मारून कारवाई केली. यात १) गोंडेगाव ते डुमरी रोड वरील चाय टपरी मध्ये छापा मारून १८० मिली च्या ३४ निप देशी दारू एकुण किमत २३८० रूपयाचा मुद्देमाल पकडुन आरोपी चंद्रकांत कुंभलकर राह.गोंडेगाव ता पारशिवनी जि नागपुर यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई केली. २) कोळसा खदान नं.३ येथे ७५० मिली च्या ५ बॉटल देशी दारू किंमत १४५० रूपये, १८० मिली च्या देशीदारू ७ निप किंमत ६३० रूपये, ९० मिली च्या ९७ निप किंमत ३३९५ रूपये असे एकुण ५४७५ रूपयाचा मुद्देमाल पकडुन आरोपी लक्ष्मन परसुराम सिंग राह. खदान नं.३ यांचे विरूध्द गुन्हा दाखल कर ण्यात आला. ३) टेकाडी येथे छापा मारून १८० मिली देशी दारू च्या ७ निप किंमत ४२० रूपये, ९० मिली देशी दारूच्या १३ निप किंमत ४५५ रूपये असे एकुण ८७५ रूपयाचा मुद्देमाल पकडुन आपोपी योगराज बलीराम मेश्राम राह. टेकाडी ता पारशिवनी जि नागपुर यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ४) गाडे घाट येथील दुकानात छापा मारून १८० मिली देशी दारूच्या १२ निप किंमत ८४० रूपयांचा मुद्देमाल पकडुन आरोपी राजन नामदेव कोथरे राह. गाडेघाट ता पारशिवनी जि नागपुर यांचे विरूध्द कारवाई करण्यात आली. ५) कोळसा खदान नं.४ येथे छापा मारला अस ता १८० मिली देशी दारूच्या ४१ निप किंमत २८७० रूपये व ९० मिली देशी दारूच्या ६० निप किंमत २१०० रूपये अशा एकुण ४९७० रूपयाचा मुद्देमाल पकडुन आरोपी महेश कालकाप्रसाद यादव राह. खदा न नं.४ ता पारशिवनी जि नागपुर यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला. ६) पिपरी- कन्हान छापा मारला असता देशी दारूच्या १३० निप किंमत २६६० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी रमेश गोविंदराव ढोमणे वय ६५ राह. पिपरी कन्हान यांचे विरूध्द कारवाई करण्यात आली. तसेत ७) नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वरील विवेकानंद नगर येथील पान टपरी मध्ये छापा मारून १८० मिली देशी दारूच्या ७ निप व विदेशी ओसी ब्लु च्या ६ निप एकुण १३ निप किंमत २५९० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी रजत प्रमोद पवार वय २२ वर्ष राह. कन्हान यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अश्या प्रकारे एकाच दिवसी स्थागुशा नागपुर ग्रामिण पथकाने ७ स्थळी छापा मारून अवैद्य देशी, विदेशी दारू विक्री करताना पकडुन एकुण १९७९० रूपयाचा मुद्देमाल जप्त करू न ७ आरोपी विरूध्द मुंदाका ६५ (ई) नुसार कारवाई करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीस स्टेशन च्या सुपुर्द करण्यात आले.
स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे सपोनि अनिल राऊत, हेकॉ विनोद काळे, नानेश्वर राऊत, अरविंद भगत, नापोशि प्रणय बनाफर, वीरेंद्र नारद, चालक पोशि मुकेश शुक्ला आदीने शिता फितीने कारवाई करून कन्हान परिसरात बिनधास्त अवैद्यरित्या दारू विक्री वर अकुंश लावण्याचा पर्यंत करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी स्थागुशा नागपुर ग्रामिण पथकाचे कौतुक करून अश्याच प्रकारे दर आठवडयात कारवाई करून परिसरातील अवैद्य दारू, नसीले पदार्थ, कोळसा, रेती, डिझेल व इतर चो-यावर अकुंश लावण्याची मागणी होत आहे.