राज्यव्यापी बजेट जलाओ आंदोलन गुरुवारी

नागपूर :- बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील 36 जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुढे केंद्रीय बजेट जलाओ आंदोलन दिनांक. 24/2/2023 ला दुपारी 2.00 वाजता. करण्यात येणार आहे. मागील वर्षी मोदी सरकारने जे बजेट सादर केले त्या पेक्षाही यावर्षी कमी बजेट सादर करुन भारतीय जनतेला फसविण्याच कार्य मोदी सरकारने केले आहे. जसे की मागील वर्षी शिक्षणावर 2.64% व या वर्षी 2.51% आरोग्यावर 2.20% या वर्षी 1.98%, शेतीवर 3.84% या वर्षी 3.20%, ग्रामीण विकास वर 5.81% या वर्षी 5.29% प्रधानमंत्री फसल बिमा योजनेवर 15,500 करोड तर या वर्षी फक्त 13,625 करोड,

म.न.रे.गा. योजनेवर मागील वर्षी 73,000 करोड तर या वर्षी मात्र फक्त 60,000 करोड, प्रधानमंत्री सन्मान निधी वर मागील वर्षी 68,000 करोड तर या वर्षी फक्त 60,000 करोड, एग्रीकल्चर फर्टीलायझर वर मागील वर्षी 2,25,000 करोड़ तर या वर्षी फक्त 1,75,000 करोड, अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय मागील वर्षी 5,020 करोड तर या वर्षी 3,017 करोड घोषित केलेले आहे. अश्याप्रकारे केन्द्र सरकारने मागील वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात भारतीय लोकांकरीता बजेट सादर केलेलं आहे. या बजेट मध्ये एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गासाठी कोणतीही विशेष तरतुद करण्यात आलेली नाही आहे व सर्व कष्ट करणाऱ्या शेतकरी, कामगार, युवा, बेरोजगार व महीलाना विकासाचा नावावर फसविले जात आहे. व त्यांना संविधनिक हक्क अधिकारापासून वंचित केलेल आहे. म्हणून भारतीय जनतेच्या मनामध्ये या सरकारचा बजेट विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे.

तो आक्रोश किंवा विरोध बहुजन मुक्ती पार्टी च्यावतीने गुरुवार ला 24/2/2023 रोजी महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये बजेट जलाओ आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यात संविधान चौक येथे अनिल बोडके, BMP जिल्हा अध्यक्ष, नागपूर यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे. या आंदोलनात अनिल बोडखे जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, जे.जी. गवई नागपुर शहराध्यक्ष नागपूर, अनिल नागरे नागपूर शहर महासचिव, सुभाष बेले उत्तर नागपूर सचिव, प्रमोद ढवळे कळमेश्वर तहसील तालुका उपाध्यक्ष यांची उपस्थिती राहतील. त्या नंतर जिल्हाधिकारी महोदय मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे उत्तमप्रकाश शंकर शहारे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

2 वर्ष से नहीं मिली छात्रवृति की रकम - इंजीनियरिंग, मैनेजमेंट, पॉलिटेक्निक कॉलेजों की हालात खराब

Thu Feb 23 , 2023
नागपुर :- केंद्र व राज्य सरकार द्वारा इंजीनियरिंग कॉलेजों में एससी, एसटी, वीजे, एनटी, एसबीसी, ओबीसी तथा ईबीसी, ईडब्ल्यूएस कैटेगरी के छात्रों की ट्यूशन फीस यानी छात्रवृति की रकम दी जाती है. प्राइवेट कॉलेजों के लिए यही रकम व्यवस्था को चलाने में मददगार बनती है लेकिन सरकार ने शैक्षणिक सत्र २०२१-२२ से इंजीनियरिंग के साथ ही पॉलिटेक्निक, आर्किटेक्चर, एमबीए, फार्मेसी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com