आपली बस कंत्राटी कामगार संघटनेचे आयुक्तांना निवेदन 

नागपूर :- आपल्या विविध मागण्यासाठी आपली बस कंत्राटी कामगार संघटना संलग्न भारतीय मंजूर संघ यांच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात मागण्याचे निवेदन देण्यात आले.

तत्पूर्वी आमदार प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली, यात आपली बस मधील सर्व कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नागेश सहारे, महासचिव कमलेश वानखेडे यांच्यासह मनपाचे उपायुक्त अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. नंतर आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ आणि पुढील सभा पंधरा दिवसात घेऊन आज झालेल्या सभेच्या संपूर्ण निर्णय घेण्यात पुढील सभेत मांडण्यात येईल असे सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेकायदेशीर पणे सेंट पॉल शाळा सुरू

Fri Oct 6 , 2023
– शिक्षण विभाग अवैधरित्या सुरू असणाऱ्या शाळेला पाठीशी घालत असल्याचे उघडकीस येत आहे काटोल :- काटोल येथील कॉटन मार्केट संस्थेच्या जागेवर सेंट पॉल इंग्रजी शाळेने काही जागा भाड्याने घेऊन अनेक वर्षांपासून शाळा सुरू होती. कॉटन मार्केट संस्थेची जागा शासनाच्या मालकीची असल्याने शासनाने नगर परिषद काटोलला व्यापार संकुल व वाहनतळ बांधण्यासाठी हस्तांतरीत केली असल्याने सेंट पॉल शाळेने ऑरेंज प्लाझा या व्यापारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!