संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– झिरो माईल नागपुर येथील श्रद्धास्थान जागा द्या
कामठी :- भारतीय भोई विकास मंडळ संलग्नित जीवन रक्षक दल व महाराष्ट्रातील अन्य समाज संघटनेच्या वतीने कामठी येथे ९ मार्च २०२५ ला राज्यांचे महसूल मंत्री व पालकमंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार संघ मैदानातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष एड. दादासाहेब वलथरे यांच्या मार्गदर्शनात व महासचिव दिलीप मेश्राम यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष मनोहर भोयर, भोई समाज पंचकमिटी चे सचिव प्रा. राहुल गौर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक भोयर, एड. ए. एन. दिघोरे, प्रा. राहुल गौर, मनोज बावने, छत्रपति ठाकरे, मुकुंदा गोंडाले, हेमराज गोंडाले, ईश्वर खंगार, खेमराज मेश्राम, अंबादास भोयर सह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
निवेदनात सांगितले की, नागपुर येथे झिरो माईल येथे असलेले स्व.खा.जतीराम बर्वे यांच्या अथक प्रयत्नांनी भोई, ढीवर, कहार व अन्य तत्सम जातीसाठी व ग्रामीण भागात असणाऱ्या गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी एक निवारा म्हणुन एक महत्वपूर्ण इमारत व जागा आहे. ही जागा विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ मर्यादित नागपुर च्या नावाने आहे. याच ठिकाणी महाराष्ट्रातील भोई समाजातील गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोई सुविधा मिळत होत्या, त्यानंतर मेट्रो विभागाने हेरिटेज सौंदर्यकरन च्या नावाने तीन इमारत असलेली इमारत नेस्तनाबूत केली. त्यानंतर मेट्रो विभागाने हि जागा आम्हाला नको असे निर्देश काढत ज्यांची जागा त्यांना परत करा असे ठरले. याच ठिकाणी शासकीय खर्चातून स्व.माजी खासदार जतीराम बर्वे यांचा १६ जानेवारी स्मृती दिवस व २१ एप्रिल ला जन्म दिवस साजरा करण्यात येतो. या माध्यमातुन महाराष्ट्रातील समाज बांधव एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात. मात्र इमारत नेस्तनाबूत केल्याने भारतीय भोई विकास मंडळ संलग्नित जीवन रक्षक दल व अन्य समाज संघटनेच्या वतीने मोर्चे, साखळी उपोषण जरून शासनाच्या निदर्शनात आनुन दिले, की ज्या प्रमाणे याच भागात आदिवासी स्मारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळा आहे. त्यांना आपण हात लावू शकत नाही. त्याच परिसरात भोई, ढीवर व अन्य तत्सम जाती जमातीचे स्व . खा.जतीराम बर्वे यांनी निर्माण केलेले श्रद्धास्थान आहे. श्रद्धास्थान हटविण्याची आजपर्यंत कोणीही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पण आमच्या भोई ढीवर समाजावर अन्याय काय, असा प्रश्न सर्व महाराष्ट्रातील समाज बांधव करीत आहे.
ज्या प्रमाणे हिंदू धर्माचे राम मंदिर सर्वांना श्रधेचे स्थान आहे. व त्या ठिकाणी राममंदिर बनविण्यात आले. त्याच श्री राम प्रभूला नय्या पार करण्यात केवट ची महत्वाची भूमिका होती. हा इतिहास आहे. त्याच इतिहासावर गदा ठेवत आमच्यावर अन्याय का, असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
शासनाला भोई समाजाच्या वतीने विनंती आहे की, आपण ज्या प्रमाणे तीन मजली इमारत नेस्तनाबूत केली. त्याच ठिकाणी शासकीय खर्चातून इमारत पूर्ववत करून देण्यात यावी.
अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रात भोई समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय भोई विकास मंडळाचे महासचिव व जिवन रक्षक दल चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांनी केला आहे.