बैंक अधिकारी विरोधात विदर्भ हैचरी असोसिएशन तर्फे पोलिस अधिक्षकांना निवेदन

नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकार मार्फत सर्वांसाठी विविध योजना राबविली जातात, शेतक-यांना, MSME लघु उद्योजकांना बैंक द्वारे विविध प्रकारचे कर्ज दिले जातात. काही वर्षा नंतर दैनिक पेपर, प्रेस माध्यमांमध्ये लोंकाना कळते कि योजनेत घोटळा झालेला आहे, घोटाळ्याची रक्कम 100 कोटी, 500 कोटी रुपयांच्या जवळपास असते. खुप वर्षानंतर त्याची चौकशी होते. ती चौकशी, कोर्टाची तारीख सुरुच राहते. पण घोटाळे होणे थांबत नाही. बैंक घोटाळ्यात बैंक अधिकारी, शाखा प्रबंधक, व मोठे बैंक अधिकारी यांचा पुर्णपणे सहभाग असतोच. महत्वाचे कि पोलिस यंत्रणा बैंक अधिकारींवर कार्यवाही लवकर करीत नाही.

या संदर्भात हैचरी असोसिएशनला सदस्यांकडुन शासकीय योजने सबंधी नागपुर क्षेतातल्या राष्ट्रीयकृत बैंकेचे बैंक अधिकारी तर्फे दुर्व्यव्हारची मानसिक त्रास झाल्याची अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। सदस्यांमध्ये बैंक मैनेजरांच्या, बैंक अधिकारीच्या दुर्व्यव्हार बद्दल तीव्र संताप रोष निर्माण झालेला आहे. यावर मागील महिन्यात हैचरी असोसिएशनच्या सर्व सदस्य, पदाधिकारीनी बैंकाच्या दुर्व्यव्हारा विरोधात निर्दशन करुन आंदोलन सुद्धा केलेले आहे. देशाचे वित्तमंत्री व वित्त विभागांनाही प्रत्यक्ष निवेदन देऊन ही झाले पण हे बैंक मोठे वरिष्ठ बैंक अधिकारी आपल्या भ्रष्ट बैंक कर्मचारी विरोधात दंडात्मक कार्यवाही करित नाहीत. शासकीय योजनेच्या अमलबजावणीत कसुर करणा-या बैंक अधिकारीवर ही गुन्हे दाखल करुन कार्यवाही करावी. केंद्रिय वित्त राज्यमंत्री डाँ. भागवत कराड सोबत विदर्भ हैचरी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पानतावणे यांची बैठक नई दिल्ली येथे जुलै महिन्यात झाली. पंजाब नेशनल बैंक मानकापुर (नागपुर) येथिल बैंक शाखा प्रबंधक सी.पी करवाडे व बैंक अधिकारी राहुल गि-हे कडुन हैचरी उद्योजकांना अरेरावी भाषा वापरुन मानसिक व शाब्दिक त्रास देण्यात आले, अश्या बेजवाबदार बैंक अधिकारींवर कार्यवाही करुन त्यांना तात्काळ नौकरीतुन बर्खास्त करण्यात यावे, बैंक मैनेजरांना व कर्मचारींना नागरिकांसोबत सन्मानाने व्यव्हार करण्याची ताकिद देण्यात यावी अश्या प्रकारचे तक्रार निवेदन बैंकेचे चेयरमन अतुल गोयल यांना ही देण्यात आले होते. तरिही बैंकेचे वरिष्ठ अधिकारी बैंक शाखा प्रबंधक सी.पी करवाडे व बैंक अधिकारी राहुल गि-हे यांच्यावर कार्यवाही न करता पाठिशी घालत आहे हे विदर्भ हैचरी असोसिएशनच्या निर्दशात दिसुन आले. सदर अधिकारी स्थानिक मराठी तरुण उद्योजकांना उडवाउडविची कारणे सांगुन दिशाभुल करतात, व काही उद्योजकांना अश्या ढिसाढ बैंक अधिकारी कडुन अपमानास्पद वागणुक मिळालेली आहे. बैंकाच्या दुर्व्यव्हारा व गैरव्यव्हारा विरोधात संताप व्यक्त करूण पंजाब नेशनल बैंक किंग्जवे नागपुर चे मुख्य क्षेत्रिय प्रबंघक चतुर्वेदी यांन विदर्भ हैचरी असोसिएशन प्रतिनिधी मंडला तर्फे निवेदन देण्यात आले. विदर्भ हैचरी असोसिएशनचे सदस्य राहुल भोरकर (वाकी), विनोद मोहोड (हिंगणा), रविशंकर रंगारी (टेकेपार भंडारा), अभिजित ठाकुर (कलमेश्वर ब्राम्हणवाडा) सोबत नागपुर एक्शन ग्रुपचे अध्यक्ष विश्वजीत सिंह उपस्थित होते व विदर्भ हैचरी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पानतावणे यांनी नागपुर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना निवेदन देऊन नागपुरातील सर्व क्षेत्रिय कार्यालय असलेल्या बैंकाकडुन शासकीय योजनेत होणा-या घोटाळे ची चौकशी करण्यास विशेष निरीक्षण टीम ची स्थापना करुन चौकशी करण्याची मागणीचे निवेदन दिले.

घोटाळा करण्याचे कार्य एवढ सोपं सहज नाही, फक्त लोन घेणाराच फसतो. बैंक अधिकारीच्या सहभागा शिवाय शक्यच नाही. शासकीय योजनेत भ्रष्टाचार करणारी ही बैंक अधिकारी वर्ग वर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी कसुर करु नये. 150 शेतक-याची फसवणुक बोल्ला सारखे बिल्ले ला दुधाचा अभिषेक व तुपाचा नैवेद्य लावणारे 103 कोटी रुपयाचे भ्रष्टाचाराचे हार घालुन बैंक घोटाळ्यात रिकार्ड मध्ये नागपुराची नोंद झालेली घटनेने प्रत्येक नागपुरकराचा मान शर्मेने घालवली आहे. वरिष्ठ शिस्त प्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारखे नेतृत्व करणारे नेते मंडळीच्या नाकाखाली बैंकेच्या माध्यमाने कोटी रपयाचे आर्थिक घोटाळे होत आहेत. या बैंक अधिकारीवर कोणाचा वचक नाही तर घोटाळे थांबणार याची शक्यता राहीली नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्युत देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना अनेक पर्याय

Tue Sep 12 , 2023
– नियमित वीजबिलांचा भरणा करा; कटू कारवाई टाळा नागपूर :- थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फे आक्रमकतेने राबविली जात असून येणा-या सुट्ट्यांचा काळ बघता वीजबिलाचा भरणा कसा करायचा असा यक्षप्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत आहे. ग्राहकांच्या या चिंतेचे निराकरण महावितरणने फार पूर्वीपासून केले आहे. महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाईन पर्यायांचा वापर करून नियमित वीजबिलांचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!