राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथे अभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

मुंबई :- राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्रातील संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता अभिरूप मुलाखतींचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले असून, यु. पी. एस. सी. परीक्षेतील महाराष्ट्रातील उमेदवारांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढावा हा यामागील उद्देश असल्याचे, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थाच्या, संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले.

या अभिरूप मुलाखतीसाठी पॅनल सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, अतिरिक्त पोलिस महानिदेशक विश्वास नांगरे पाटील, लोहमार्ग पोलीस आयुक्त, मुंबई डॉ. रवीद्र शिसवे, मुख्य आयकर आयुक्त, जयंत जव्हेरी, झोनल विकास आयुक्त, सेझ महाराष्ट्र गोवा दीव दमण, दादरा नगर हवेली ज्ञानेश्वर पाटील, संचालक, अणुविभाग नितीन जावळे, अक्षय पाटील (आयकर विभाग), माजी आय.आर.एस. व आय.पी.एस. अधिकारी विकास अहलावत, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा तसेच ए.आर.ओ.सी मध्ये कार्यरत रुजूता बनकर तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ञ प्रा. भूषण देशमुख आदि उपस्थित होते.

या मुलाखतीचा लाभ 22 विद्यार्थ्यांनी घेतला असून या यूपीएससी अभिरूप मुलाखतीचा पुढील टप्पा ऑनलाईन स्वरूपात होणार असल्याचे संचालक डॉ. पाटोळे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दिल्ली ते पुणे सायकल मोहिमेच्या तिसऱ्या पर्वाची लष्करी सहभागासह सुरुवात

Sun Feb 9 , 2025
नवी दिल्ली :- दिल्ली ते पुणे सायकल मोहिमेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात शनिवारी आर. के. पुरम येथून नॅशनल वॉर मेमोरियलपर्यंतच्या आनंद यात्रेने (Joy Ride) झाली. या उपक्रमात भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस तसेच दिल्ली वाहतूक पोलिसांच्या सायकलिंग संघांनी सहभाग घेतला. या सायकल रॅलीचे आयोजन ‘हिंद अयान’ या संस्थेने केले. या संस्थेचे सहसंस्थापक विष्णूदास चापके हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!