राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार

मुंबई :- राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आला आहे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याशिवाय, बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान विभागाने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. कालच यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.

बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल. त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विरोधी पक्ष शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल रमेश बैस यांची राज भवन,मुंबई येथे भेट 

Mon Jul 17 , 2023
मुंबई :- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षातील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राज भवन, मुंबई येथे भेट घेऊन मा. राज्यपालांना निवेदन सादर केले यावेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अंबादास दानवे, जयंत पाटील, जयंत पाटील (शेकाप), डॉ नितीन राऊत, एडव्होकेट अनिल परब, सुनील प्रभु, अनिल देशमुख, राजेश टोपे, रोहीत पवार उपस्थित होते. Follow […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com