मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा – मंत्री नितेश राणे

– देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार

– स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार

मुंबई :- मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान केल्या.

मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री राणे यांच्याशी महावाणिज्य दूत ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राणे यांनी सांगितले की, मुंबई महानगरामध्ये वाहतूक यंत्रणेवर ताण येत असून ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. स्वीडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल.

ओस्टबर्ग यांनी महाराष्ट्रातील पोर्टच्या विकासात स्वारस्य दाखवित म्हणाले की, स्वीडनची कॅंडेला कंपनी येवून सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करू.

पोर्टच्या ससून डॉकला मॉडेल पोर्ट करा – मंत्री राणे

महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याने सांगितल्याने मंत्री राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली. स्वीडन कंपनीने राज्य शासनाला पोर्टच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करावा. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून देशात एक नंबर होईल, असे मॉडेल पोर्ट विकसित करावे. यासाठी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

ओस्टबर्ग यांनी पोर्टचा विकास, स्वच्छता, सोयी-सुविधा, गुंतवणुकीबाबतची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विधानसभा प्रश्नोत्तर : कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीतील 'टीडीआर' गैरव्यवहाराबाबत दंडात्मक कारवाई - मंत्री उदय सामंत

Fri Mar 21 , 2025
मुंबई :- कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील मौजे गावदेवी येथील जमिनीबाबत जमीन विकास हक्क हस्तांतरणात (टीडीआर) गैरव्यवहार झाल्याची चौकशी ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या जमिनीच्या ‘टीडीआर’ गैरव्यवहारप्रकरणी ७ कोटी वसुलीची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जमीन विकास हक्क हस्तांतरण बाबत सदस्य किसन कथोरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!