मतदार जनजागृती अभियानाला सुरूवात

– सेल्फी स्टँडवर आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी काढला सेल्फी

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर शहरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना शुभारंभ केला.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील दालनात सेल्फी स्टँडचे देखील त्यांनी लोकार्पण केले. यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी सेल्फी काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरामध्ये मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे. या अंतर्गत नवीन तसेच सर्व मतदारांना २० नोव्हेंबर २०२४ रोजी अवश्य मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या जाहिरातींवर ठेवा विशेष लक्ष,निवडणूक निरीक्षक राजेश कल्याणम यांची माध्यम प्रमाणिकरण कक्षाला भेट

Fri Oct 25 , 2024
गडचिरोली :- वृत्तपत्रांसोबतच इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक विषयक जाहिराती व पेड न्यूजवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी आज दिल्या. निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षाला (एम.सी.एम.सी.) भेट देत पाहणी केली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com