रामटेक :-विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम

मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत.एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने संप चिघळला आहे.
रामटेक डेपोमद्ये आंदोलनचा तेरावा दिवस असून प्रवासांचे हाल झाले आहेत.सर्व आंदोलन कर्त्यांनी रामटेक डेपो येथे जेवण करून तेरवी साजरी केली.आणखी किती दिवस संप सुरू राहील असा प्रश्न नागरीक करत आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. घरातील कर्ता धरता आंदोलनात असताना , त्यांचा घरची परिस्थिती बेताची झाली, काहींचे घरभाडे, काहींचे लाईट बिल, पोरांचे शिक्षण , वृद्ध आई वडिलांचा औषधपचार ,
अश्या बऱ्याच समस्यांचा या कर्मचाऱ्यांना सामना करावा लागतो आहे. दिवाळीचा सण सगळ्या देशभरात साजरा होत होता परंतु या कर्मचाऱ्यांचा घरी एकही दिवा जळालेला नाही. यावर कधी तोडगा निघेल यावर सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. रामटेक डेपोतील रा.प. कर्मचारी वर्ग, एसटी चे राज्यशासनात विलीनीकरण करून शासन नियमा प्रमाणे सर्व सोईसवलती, वेतन, भत्ते लागू करण्यात यावे, याकरिता बेमुदत संपामध्ये कर्मचारी सहभागी झाले आहेत…….